सातव्या किंवा नवव्या महिन्यामध्ये हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो. डोहाळे जेवणालाच काही ठिकाणी ओट भरणं किंवा सातांगळं असं म्हणतात.प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात गर्भारपण हा महत्त्वाचा क्षण असतो आणि त्यातही आनंदादायी असते ते डोहाळे जेवण. डोहाळे जेवणाच्या निमित्ताने गर्भवती महिलेचं सर्व कुटुंबियांकडून आणि मित्रपरिवारांकडून कोडकौतुक करण्यात येतं. या समारंभासाठी बरंच प्लॅनिंग केलं जातं. आजकाल बरेच जण डोहाळेजेवण अगदी थाटामाटात साजरं करतात. तर काहीजण अगदी साध्या पद्धतीने आणि घरगुती समारंभ करतात. पण दोन्हीमध्ये सजावटही महत्त्वाची असतेच. तुमच्याकडेही जर डोहाळे जेवण असल्यास आणि तुम्ही त्याच्या सजावटीसाठी आयडियाच्या शोधात असाल तर खालील डोहाळे जेवण सजावटीचे फोटोज नक्की पाहा. तुम्हाला सजावटीसाठी नक्कीच मदत होईल. पारंपारिक सजावट, चंद्र आणि डोहाळे जेवण थाटामाठानं गणगोतांच्या सहवासात डोहाळजेवणं साजरी केली जातात. आवडी निवडीचे शिजवीत तिला धीर दिला जातो. हिरव्या बांगड्या, हिरवी साडी, फुलांचा रंगीबेरंगी साज तिच्या साठी आणून हौस मौजेने तिचं कौतुक मांडल जातं.गर्भीणनारी तुझा गर्भ डौलदारउदराला येऊं दे कृष्णदेवाचा अवतार सुटसुटीत आणि सुरेख सजावटडोहाळेजेवणासाठी हिरवी साडी, फुलांची वाडी, पाच फळे आणि ओटी हे लागतं, तसेच फराळ/ पंचपक्वान्न/ इतर खावेसे वाटणारे पदार्थ यांच एक ताट त्यात पाच वाट्यांमध्ये प्रत्येकी एका वाटीत एक याप्रमाणे पेढा, बर्फी, रूपया वै ठेवुन त्यावर पुरी झाकुन ठेवतात आणि ते उघडायला लावतात. १. हा कार्यक्रम सन्ध्याकाळी व सुर्यास्ताच्या आधी करतात. २. जिचे डोहाळजेवण आहे तिला हिरव्या रंगाची साडी/ड्रेस भेट म्हणून देतात (नव्-निर्मितिचा रंग हिरवा असतो म्हणून). हल्ली इतरही भेटवस्तू दिल्या जातात, उद. गर्भसंस्कार व. पुस्तके इ. ३. ओटी ५ प्रकारच्या फळांनी भरणे. फक्त सासूबाईंनी ओटी भरायची, इतर स्त्रियांनी ५ फळे हाती लावणे. ४. जेवणासाठी पंचपक्वान्ने – जिचे डोहाळजेवण आहे तिच्या आवडीची करावीत. यात गंमत म्हणून एक स्त्रिलिन्गी व एक पुल्लिन्गी पक्वान्न असावे. उदा. खीर व लाडू. अशा २ पदार्थांवर पुरी झाकून तिला एक पसंत करावयास सांगणे व त्यानुसार मुलगा/मुलगी हे ठरवतात. ४. फुलांची/चांदण्याची वाडी भरणे या गोष्टी ऐच्छिक व प्रत्येक घराण्याप्रमाणे वेगळ्या असू शकतात.हौस असेल तर चांदण्यातले, बोटीतले, बागेतले, कोवळ्या उन्हातले असे वेगवेगळे डोहाळेजेवण पण करतात.डोहाळे जेवण साज डोहाळे जेवणाची जय्यत तयारी आता अनिकेत इव्हेंट्सची जवाबदारी. सुंदर सजवलेला पाळणा-झोपाळा असो वा ताज्या फुलांचे दागिने, हॉल ची सजावट असो वा घरगुती सजावट, आम्ही घेतो तुमच्या या नाजूक क्षणाची पूर्ण काळजी. बुक करण्यासाठी आता कॉलकरा 098811 17125
Tag Archives: dohale jevan decoration
Best Ideas for Baby Shower
The child is en route, its a unique time for a family who is trusting that somebody will come and make them more joyful. Loads of gifts and toys are continually trusting that the child will come in the realm of bliss. In this occasion, there are numerous perspectives that make it an uncommon occasion,Continue reading “Best Ideas for Baby Shower”